Saturday, April 11, 2009

मैत्रीचं हे नातं

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...