Saturday, April 11, 2009

तू नसताना

नसताना.......

तू नसताना आठवतात,
असतानाचे क्षण
दोघांनी मिळून केलेले
कित्येक पण....

आठवते ती हुरहुर,
मनातलं ते काहुर
तुझ तो रुसवा,
नि प्रेमाची ती चाहुल.......

आठवतो तो पाऊस,
नि पावसातले आपण...
एकमेकांच्या नजरेतलं
हरवलेलं 'मी'पण.......

आठवतात दोघांचे उमलण्याचे दिवस.
स्वप्नांच्या वाटेनी
फ़ुलण्यचे दिवस............

एकमेकांना सावरत
चालण्याचे दिवस,
वार्यावर शीळ घालात
झुलण्याचे दिवस............

चांदण्याच्या रात्रि
जागायचे दिवस,
एकमेकांना प्रत्येक क्षणी,
मागायचे दिवस.........!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...