Saturday, April 4, 2009

एक तरी मैत्रीण अशी हवी

एक तरी मैत्रीण अशी हवी
एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेडया मित्राची
समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरचं! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीण' हवी जी आपणास मित्र म्हणवणारी
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...