Monday, September 28, 2009

मैत्री....

मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी

मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा

मैत्री....
एक रोपटे अबोलीचे प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीतले

मैत्री....
एक सुगन्धी दरवळणारे लिहलेले पत्र
खुशालीसाठी उशीराही का होईना नाही पाठवावे मात्र

मैत्री....
एक नात कसल्याही मोहात न अड्कणारे
निरागसता जपताना खळखळुन हसवणारे


मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही न वाकणारे


मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा लख्ख प्रकाश देणारा 'मोती'आला का हाती?

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...