Sunday, September 26, 2010

जाता जाता एकदा तरी बोलून जा

जाता जाता एकदा तरी बोलून जा 

जाता जाता एकदा तरी , बोलून जा ...
माझ्या नजरेच्या प्रश्नाला उत्तर देवून जा
तुझा चेहरा असा अबोल नसावा
कदाचित, त्याचा अर्थ वेगळाच निघेल
जर माझ काही चुकल असेल
तर, तू प्रेमान माफ करत जा
कडू आंबट अनुभव मनात राहतात
तरी , त्यांना प्रेमान उजाळा देत जा
मनाच्या अबोल भिंतीआड
अशी गप्पा राहू नको , माझ्यासाठी
तरी, तू बोलत जा ..
जाता जाता तुला शपथ देतो प्रेमाची
तू नेहमी हसताना दिसायला हवीस
तू तुझे दुख: खुशाल मला देवून जा
जाता जाता एकदा तरी बोलून जा

मनोज गोबे

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...