Thursday, September 23, 2010

सांग तू साथ देशील ना मला

सांग तू साथ देशील ना मला

ह्या ओसाडलेल्या माळरानावर

आपल्या प्रेमाची बाग फुलवायची आहे मला
उद्याची हिरवी स्वप्नं साकारताना
तुझ्या हिंमतीची जोड हवी मला
ह्या गवताच्या झोपडीत
मोडका संसार थाटायचा आहे मला
माझ्या खांद्याला खांदा देशील
याची यास आहे मला
निष्पाप मनाच्या घरट्याला,  तुझ्या
प्रेमाच्या फांदीचा आधार हवाय मला
थकून आलेल्या जीवाला तुझ्या मायेच्या
सावलीत निवारा हवाय मला
कष्टाच्या चाकोरीतून जाताना
दु:खाचे चटके सोसावे लागणार
आयुष्याचा गाडा ओढताना  खाचखळग्यातून
जाव लागणार आहे तुला
मला अभिमान आहे तुझ्या कर्तुत्वाचा
दु:खात असताना हि आनंदी राहायचा, जर
नाहीच पेलवला ह ओझ तरी चालेल मला पण
तुझा सहवास हवाय आयुष्य भरासाठी मला
सांग तू साथ देशील ना मला

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...