Thursday, September 23, 2010

प्रेम - भावनांचा खेळ ?

प्रेम - भावनांचा खेळ ?

प्रेम हा मुगजळ रुपी भावनांचा खेळ
नाही बसत त्याचा जीवनाशी मेळ
कळत नकळत जर पडलात 'च' प्रेमात
तर फसवू नका कोणाला आश्वासनांत 
प्रेम प्रेम नुसते म्हणायचे नसते
तर ते टिकवायचेही  असते
प्रेमात नुसत्या आणा-भाका खायच्या नसतात
तर त्या सत्यात उतरवायच्या असतात
प्रेमात चंद्र सूर्याची अतिशयोक्ती करायची नसते
तर प्रेमात भावनांची कदर करायची असते
असू नये प्रेमात फक्त स्वप्नांचे मैदान
तर असावे वास्तवतेचे भान
प्रेम हा काही खेळ नाही
दुसर्याच्या भावना दुखवायच्या
आपल्याला असा हक्क नाही

- मनोज गोबे  No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...