Thursday, September 23, 2010

एक थेंब माझ्या आटवणीतला

 एक थेंब माझ्या आटवणीतला

एक थेंब पडावा एका वाळल्या रानामाधी
तुझी माझी भेट व्हावी एका ओल्या पावसामधी
एका थेंबाने पान सरसरावी  
माझ्या स्पर्शाने तुझी नजर खाली जावी
ते लाजणे खुदकन हसणे
तुझी ती नाजूक छबी मनी भरावी
एका थेंबाने नवीन पालवी फुटावी
तू नाही म्हणता म्हणता माझ्या मिटीत यावी
त्या चिंब भिजलेल्या उबदार मिटीत गाणी म्हणावी
त्यातली एखादी ओळ मला समजवावी
एका थेंबाने एखादी काळी ती फुलावी
जणू एखाद्या गर्दीत आपली नजर भेट व्हावी
तुझं हसण तुझी गालावरची खळी
त्या पावसात तू स्वप्नातल्या परीसारखी दिसावी
हि तर सादी स्वप्नाची कहाणी
तुला एकदा भिजताना पहावी
तुला एकदा मिटीत घ्यावी
तेवढ्या पावसापुरती तरी तू माझी असावी


- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...