Sunday, September 26, 2010

वळणावर... तुझाच एक ...

वळणावर

वळणावरून वळताना

मागे  वळून पाहू नकोस
गालात उगीचच हसू नकोस
गालात हसताना पापण्या अलगद मिटू नकोस
धुंद गहिऱ्या डोळ्यात 
माझे  स्वप्न  पाहू नकोस
आणि  स्वप्नात  बोलावले  तरीही
तू  माझा  होशील  का  ?
हा  प्रश्न  विचारू  नकोस
का  ? ते  विचारू  नकोस
उत्तर  कधीही  मागू   नकोस
म्हणूनच  ..
माझ्या  आयुष्याच्या  वळणावर
पुन्हा  कधी  येऊ  नकोस
आणि  आलीस  तरीही  भूतकाळात  पाहू  नकोस
तुझाच  एक ...

मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...