Monday, May 11, 2009

मन

आता मन क्षणात पार करतं
समुद्राच्या पुळणीवर तुझी वाट पहात असतं
बघ तुला जाणवतात का माझे श्वास माझी साद
बघ कुठे खोलवर उठते का कळ मनात
बघ तुझ्या वाटेवरती आहे का उन हसणारे
बघ कुठे पानाआडुन डोकावते फ़ुल सोनसळे
तिथेच असेन मी देखील,तुझ्या जवळ आस-पास
तुला मात्र वाटत राहिल काहितरि होतात भास
आता या सार्‍यातुन, मीच मला भेटत राहीन
तुझ्यापसुन दुर राहुन रोजच तुला भेटत राहीन

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...