Monday, May 11, 2009

आसाच आहे मी

आसाच आहे मी कारण नसताना
ही तुझ्याशी भांडनारा
आणि तरी ही तुझ्यावाचून
पावलो पावली आड़नारा


जख्मा तू किती ही दे
जख्मांच काही वाटत नाही
पण फुंकर मारायला तू आलीस
हे काही पटत नाही


खुप बडबड़त असते ती
का हे काही कळत नाही
एकच गोष्ट सांगायची आहे तिला
पण मला काही जमत नाही


कोनासाठी रडतोस .का विरह करतोस
कोणासाठी थांबनारे कोणी ही नसते
जगाचा नियम आहे ,आटळ सत्य आहे
प्रत्येकाच संचित त्याने आधीच लिहिलेले असते


उघडेल नशिबाचे दार
तु माझी होण्याने
बदलेल बघ सार जग माझे
तु माझ्या घरी येण्याने


तुझे ते हास्य
सार काही विसरायला लावते
आणि तुला हे सांगायच
तर मन घाबरायला लागते


तुझे नाव हृदया मध्ये
स्वताच घर करून बसलय
सुखी संसराच आपल्या
पहाटेच स्वप्न मला दिसलय


कधी कधी नकळत आस काही घडते
ठरवतो एक आणि नसती आफत गळ्यात पड़ते
टाळत आसतो आपण जीला ठरवून ठरवून
तीच समोर येते आणि गाड़ी आपली आड़ते


ह्रुदयात साठवून ठेव माला
आता विरुद्ध दिशेला जायचय
गोल आसेल ना जर जग
लक्ष्यात ठेव परत भेटायचय

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...