Monday, May 11, 2009

बघ माझी आठवण येते का?

ग्लासभर दारु खिडकीत
उभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, ग्लासमधे
झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारा
बियरचा फेस
चेहर्यावर घे
डोळे मिटून घे,
तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर
बाहेर पड, गुत्त्यावर
ये
तो भरलेला असेलच,
टेबलावर हात ठेवुन
बसुन रहा
खुर्ची सरकेल
बुडाखाली, बघ माझी
आठवण येते का?
मग पिऊ लाग, दारुचे
अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा
संपेपर्यत, तो संपणार
नाहिच , शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस,
ग्लास पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत
ये
आता बेवड्यांची वाट
बघ, बघ माझी आठवण येते
का?

दारावर बेल वाजेल,
दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली
बाटली घे, ओपनर तो
स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला
तुझ्या झिंगण्याचं
कारण, तू म्हणं ज्युस
संपलंय
मग चिअर्स कर , तूही घे
तो उठून हिमेश
रेशमिया लावेल, तो तू
बंद कर
gulam ali लाव,
बघ माझी आठवण येते का.....

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...