Monday, May 11, 2009

मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

कोणी मागितला हात मदतीचा
तर मी देउ शकलो की नाही...
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

मागितली असेल कोणी साथ
तर देऊ शकलो की नाही....
कोणास ठाउक.....
विश्वासाला खरा उतरु शकलो की नाही

संकटांचा झाला भडिमार
तरी खंबीर राहू शकलो की नाही
कोणास ठाउक.....
आलेल्या वादळांना तोंड देऊ शकलो की नाही

ढासळले खूप अश्रू कोणी
तर पुसू शकलो की नाही.....
कोणास ठाउक.....
माझ्याच अश्रूंना वारा देऊ शकलो की नाही

म्हणती सारे तू माझा मित्र खरा
तर मैत्रीला पात्र ठरु शकलो की नाही
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...