Monday, May 11, 2009

एकांत माझा............

एकांत माझा............
एकांत माझा............
कोणी नसत सोबत तेव्हा
माझा एकांत साथ देतो मला.............

जिथ सावली सुद्धा साथ सोडून निघून जाते
त्या अंधारात माझा एकांत साथ देतो मला...........

जुन्या आठवांना आठवून
हसताना तर कधी कधी रडताना
माझा एकांत साथ देतो मला........

राग आला न मला
की मनसोक्त भांडायला अन राग शांत करायला
माझा एकांत साथ देतो मला...........

साठवलेले गोड क्षण
गोंजारून पुन्हा साठवायला
माझा एकांत साथ देतो मला..........

कधीही पाठ न फिरवता
शेवटपर्यंत......... एकांत माझा............

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...