Monday, May 11, 2009

सुखी मला समजु नका

हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
हास्यामागिल खरा चेहरा
तुम्ही मात्र पहु नका
दिसला जरी तो चुकून
तरी तसे मला भासवु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
काही भोग हे आसे ही आसतात
जे स्वताच स्वताचे भोगायाचे असतात
आतामध्येच आश्रू ढालुन
डोळ्या मधून हसवयाचे असतात
काही घाव असे ही असतात
जे हसत हसत झेलायचे असतात
किती ही जख्मी झाले हृदय तरी
आतल्या आत पेलायचे असतात
झालेल्या त्या जख्माना
तुम्ही मात्र उकरू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
होत कधी अस ही खरच
मी हसत असतो
झालेल्या नविन जख्मानी
जुन्याना विसरत असतो
भरत आलेल्या त्या जखमांची
खपली तुम्ही काढू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...