Sunday, May 10, 2009

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठावणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पावूस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे

उसलणारा बेछुट दरया नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातिल एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे......!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...