Monday, May 11, 2009

मी तेंव्हा

मी तेंव्हा वसंत साहून गेलो
खुल्या आसमंती राहून गेलो ...

तो पूर होता कसा आसवांचा?
मी लोचनांतून वाहून गेलो !!

ही वेदना तू दिलेली असावी
व्रुथा ना तिला मी चाहून गेलो.

पाहण्या जोगे उरले ना काही
मनाचे दिवाळे पाहून गेलो !!

नकोसा जगाला होऊ लागता ...
मी या चितेवर स्वतःहून गेलो !!!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...