Monday, May 11, 2009

काही भावना अशाच असतात

काही भावना अशाच असतात
सांगता येत नाहीत शब्दात
काही गोष्टी अशाच असतात
राहतात नेहमी मनात
काही स्मित अशीच असतात
दिसतात प्रत्येक चेहरयात
ठेवतात दडवून अनेक अश्रू
पापण्यांच्या कोनात
काही डोळे असेच असतात
नेहमी काहीतरी शोधतात
कुणी येणार नाही ठाऊक असूनही
ते वाट बघतात
काही ओळी अशाच असतात
हृदयच्या कप्प्यात
लिहाव म्हणल तरी उतरत नाहीत
कवितेच्या साच्यात.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...