Saturday, January 22, 2011

त्या क्षणा कधी सोडणार नाही ..

वाट तुझी पाहताना तुला
अंधार झालेला उमजला नाही
कसे काय या आंधळ्या नात्याला
गंध समजला नाही

नाही मी इतका निर्दयी वेडे

मी आहे तसाच आहे
नाही घेत कुणाचा आधार
मी नी:शब्द उभा आहे

देईन मी तुला सावली

जरी नसलो समोर मी
मुग्जल मी असलो तरी
मनोकामना पूर्ण होईल ती

प्रत्येक वळणावर तु अशी

एकटी पडणार नाहीस
असेन साथीला सखा बनुनी
खात्री आहे ...
त्या क्षणा कधी सोडणार नाही ..

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...