Thursday, February 24, 2011

कॉलेज ( विडंबन )

पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा !
बाजुबंद त्या गोठ-पाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा !
मुंडावळि या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणींचा घेउन जा तू माहेराचा घडा !
स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ही मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्यांच्या या कडा !

कॉलेज ( विडंबन )

कपडे तंग हे अंगी घातले,वर केसांचा तुरा
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
लांडा मनिला अंगी घातला,दिसतो चोळीवाणी
त्यातून दिसते छाती तुझीरे अगदीच केविलवाणी
नित्य तुझ्यारे मुखात असतो,गुटक्याचा तोबरा
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
शर्ट तांबडा,पॅंट ही पिवळी, बुट ते टोकदार
छाप मारण्या साठी मुलींवर,तो सिगरेटचा धूर
ह्या सगळ्या रे मेकअप ने तू चालू दिसतोस खरा.
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
उनाड मुलापरी,घुमत रहा तू, चित्रगृहाच्या दारी
त्यातून थोडी सवड काढुनि,कर तू मारामारी
भारतीय त्या परंपरेचा, वारस आहे बरा….
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...