Friday, October 19, 2012

पण वास्तव तर वेगळाच आहे न ? म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

 म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...


जिते लोक हमेशा खोटेच बोलतात 
कोणतेही नाते खोटे बोलून ठरवतात 
नन्तर तेच आम्हचावारच आरोप करतात  ..
पण वास्तव तर वेगळाच आहे न ? 
तुम्ही खोटे बोलले नसता तर,  हे झालेच नसते.. आम्ही फसलो नसतो 
दिखावा ? डोंग ? आणि म्हणे आमचे प्रेम आहे तुमच्यावर ...???

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

आज इथे उद्या तिथे...कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.... 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...