Friday, October 12, 2012

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी


तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले
तूझी माझी भेट एक इतिहास बनला होता

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी
माझ्या हृदयाला आयुष्यभर भिजवणार होते

तू एवढे प्रेम करतेस माझ्यावर
हे तू बोलूनही दाखवायची
पण ...?
नात्यांच्या जाळ्यांतून का तू सोडवू न पहायचीस..
आज तुझी आणि माझी भेट स्वप्नात हि होत नाही

तुझा विचार करतो
पण समोर तू केलेला अंधार बघ जात नाही ..!!
तुझी माझे बोलणेच फक्त जपून ठेवलंय
कुणी ऐकू नये म्हणून तयास हृदयातील स्पंदन बनवून ठेवलंय ..
तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले ..!!

2 comments:

  1. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
    आपला मराठी ब्लॉग ... http://www.marathiblogs.in/ वर जोडा
    आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
    जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...