Friday, October 12, 2012

मनामध्ये मन माझे आताच दाटले ...

रंग होळीचे हे कधी रंगलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही...

आसवांचे झरे हे असे वाहत गेले की
अश्रुथेंब कधी हे अटलेच नाही...

वाटेवर या अशा बिकट चालतो मी एकटा
माझ्यासाठी मन तुझे गोठलेच नाही...

मनामध्ये मन माझे आताच दाटले 
पावसासंगे संगे अश्रु कधी टाळलेच नाही...

तिचे माझे रस्ते हे असे दुभंगत गेले की-
हातांना या हात कधी मिळ्लेच नाही...

पाने गळून गेली सारी पानझडीचा वृक्ष झालो 
हर्ष होऊन पाने कधी सळसळलीच नाही...

दु:ख माझे तू तर कधी गिळलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही......

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...