Monday, October 8, 2012

आपण कुणालातरी आवडणं...

खरच ! किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,...
कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच
पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,

देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

--------------------------------------------------

फक्त एकदा सांग तुला,माझी आठवण येते का?

एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?
नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?
मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?

एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस का?

जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?

अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस का?

चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?

कोणी नाही जाणून सुधा मागे वळूनपाहतेस का?

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...