Wednesday, May 8, 2013

तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...

आज सकाळीच एक call  आलाजो मला ऐकायचा न्हवता...पण मला माहित होता तो येईल..
आपल्या दोघांच्या एक जुनी मैत्रीण फोन वर सांगत होती
म्हणत होती तुला कुणी भेटलंय.. 

... आणि मला आपली सगळी दुर्भाग्यं आठवली
आणि आपण केलेले संघर्ष आठवले
 आणि कसा मी स्वतःच हरलो आणि तू ही
आपल्या प्रेमाच्या उघड्या दाराबाहेर हे कसले आवाज आहेत
जे आपल्याला आपल्या प्रेमाच्या समाधानापासून बाहेर फेकतायेत
आणि अजून काहीतरी मिळवण्यासाठी भिक मागतंय

... मी आता तुझ्याशिवाय जगण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करतोय
 पण मला कधीकधी तुझी आठवण येते
जितकं मला जास्त माहित होतंय.., तेवढं कमी समजत चाललंय
त्या सगळ्या गोष्टी ज्या मला आधीपासून माहितीयेत.., त्या मी परत एकदा शिकतोय
कारण माझी समीकरणंच सगळी मोडलीयेत
मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
 पण माझी इच्छाशक्ती दुबळी होते
आणि माझे विचार विस्कटतात असं वाटतं
पण मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...

 
हा काळच खूप अनिश्चित आहे
जो खूप शोक करत बसलाय
 लोकांची मनं क्रोधाने भरलीयेत
आम्हाला सर्वांना फक्त थोडी दया पाहिजे
प्रेम ह्या रुक्ष युगात कसं काय टिकून राहू शकतं
लोकांचा विश्वास, आत्मविश्वास हेच आनंदाकडे घेऊन जाणारं आहे
अश्या कितीतरी गोष्टी आम्ही मारू शकू असं वाटतंय
गर्व आणि स्पर्धा हे मोकळे बाहू नाही भरू शकत
आणि जे काही त्यांनी आपल्या दोघांमध्ये आणून टाकलंय
 तुला माहितीये ते मला स्वस्थ नाही राहून देणार
 
 मी आता तुझ्याशिवाय राहायचा प्रयत्न करतोय
पण मी तुझी आठवण काढत असतो प्रिये
 जितकं मला जास्त माहित होतंय.., तेवढं कमी समजत चाललंय
 आणि सर्व गोष्टी ज्या मी शोधून काढल्यात, मला त्या पुन्हा शिकाव्या लागणार आहेत
 मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
 पण माझी इच्छाशक्ती दुबळी होते
 आणि माझं हृदय खूप विखुरतंय
 पण मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...

 
तुझ्या आयुष्यात आलेली आणि गेलेली ती सगळी लोकं 
 त्यांनी तुला कमी दाखवलं, तुला माहितीये तुझा स्वाभिमान त्यांनी दुखावलंय
हे सगळं तू मागेच ठेवलेलं चांगलं आहे, कारण आयुष्य तर थांबणार नाहीये
जर तू तो राग डोक्यात घालून घेतलास , तो तुला आतून बाहेरून खात राहील
 
मला इथून पुढे आनंदी रहायचय
 आणि माझं हृदय खूप विखुरलाय
 पण मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
 हो तुला विसरण्यावर..
 जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
 तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...
 
 मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
 कारण माझं अंगावरचं मांस उतरत चाललंय
 आणि राख विखुरत चाललीये
 म्हणून मी विचार करतोय तुला विसरून जाण्याचा
 हो तुला विसरण्यावर..
 जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
 तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...