Wednesday, July 27, 2011

उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ,

उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ,
मी एकटाच पाखरासारखा भिरभिरणारा ,
आपल्याच घराची वा...ट चुकणारा ,
कुणी दिसतंय का ? मला रस्ता दाखवणारं ,
भरल्या डोळ्यांनी तुला शोधणारा .
कुठे होतीस तू .
माझे असा काय चुकलं होतं ,
मी तुझ्यावर प्रेम केलं होतं ,
कदर माझ्या प्रेमाची झालीच नाही .
तुला माझी आठवण कधी आलीच नाही .
उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू .
मला माफ कर एवढंच बोललीस ,
परत कधी न भेटण्याची विनवणी केलीस ,
जाता जाता आयुष्यातून , रंगच काढून गेलीस ,
बेरंग जगलो .
म्हणूनच उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ?
काळाने जखमांची भरणी केली ,
रडून रडून पापणी सुकून गेली .
तेव्हा उमगले चूक करतोय ,
मी कुणासाठी मरतोय ,
परत पंख सावरले , आकाशात उडण्यासाठी ,
म्हणूनच उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ?
आता कुठे सावरलो होतो ,
उंच भराऱ्या घेत होतो .
न कसली चिंता , नको आधार कुणाचा .
आता मी आनंदी होतो .
नियतीला का मान्य नाही ,
का असा खेळ खेळते ,
सर्वे काही सुरळीत असताना ,
परत तुझी चाहूल येते ,
मी आलेय ,मला स्वीकार ,
मला परत तुझे व्हायचं ,
झाल्या चुका माफ कर .
आता फक्त तुझ्यासोबत जगायचं .
म्हणूनच , उत्तर हवंय मला , कुठे होतीस तू .?
परत प्रश्नांचा भडीमार ! उत्तरांची कमतरता !
परत माझ्या जगण्यात , परत आली अस्वथता !
आता फक्त एकंच प्रश्न तुला विचारायचं !
कुठे होतीस तू ? आहे का उत्तर ?
उत्तर हवंय .
माझ्या आठवणींच ,
तुझी वेडी वाट पाहण्याचं ,
उत्तर हवंय ,
माझ्या बेरंग जगण्याच ,
एकटं फिरण्याचं ,
कधी न विसरणार्या , त्या अमोल क्षणाचं !

2 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. People look for the Perfect Person to LOVE....but they fail to realize that : A person becomes Perfect when we begin to LOVE them Sincerely...!!!

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...