Thursday, July 28, 2011

अंतर्भाव

सिद्ध होउनि बैसला | दृष्टी नाणी साधनाला |
सादर अशन शयानाला | अत्यादरे करुनी ||
ऐसा जो विषयासक्त | अत्यंत विषई आसक्त |
सिद्धपणे आपुला घात |तेणे केला ||
जो सिध्दांचा मस्तकमणी |माहांतापासी शूळपाणी |
तो हि आसक्त श्रवणी | जपध्यान पूजेसी ||
अखंड वाचे रामनाम |अनुष्ठाता हि परम |
ज्ञान वैराग्य संपन्न |सामर्थ्य सिंधू ||
तो हि म्हणे मी साधक | तेथे मानव बापुडे रंक |
सिद्धपणाचे कौतुक |केवीं घडे ||
म्हणौनी साधनेसी जो सिद्ध |तोचि ज्ञाता परम शुध्द |
येर ते जाणावे अबध्द | अप्रमाण ||
साधनेवीण बाष्कळता |ते चि जाणावी बद्धता |
तेणे घडे अनर्गळता | आसक्ती रूपे ||
मन सुखावले जिकडे | आंग टाकले तिकडे |
साधन उपाय नावडे | अंतरापासूनि ||
चित्ती विषयाची आस |साधन म्हणता उपजे त्रास |
नेम धरिता कासावीस |परम वाटे ||
दृढ देहाची आसक्ती |तेथे कैची पां विरक्ती |
विरक्ती वीण भक्ती | केवी घडे ||
ऐक गा शिष्या टिळकां | नेम नाही ज्या साधका |
तयासी अंती धोका |नेमस्त आहे ||
तवं शिष्ये केली विनंती |अंशी मती तेचि गती |
ऐसे सर्वत्र बोलती |तरी मी काये करू ||
अंती कोण अनुसंधान |कोठे ठेवावे हे मन |
कैसे राहे समाधान |तये समयी ||
अंत समयो येईल कैसा | हा तो न कळे भर्वसा |
प्राप्त होईल कोण दशा | हे तो श्रुत नाही ||
ऐसी आशंका घेतली मने | शिष्य बोले करुणा वचने |
याचे उत्तर श्रोते जाने | सावध परिसावे ||

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...