Wednesday, August 11, 2010

कळले कधी न मजला,

कळले कधी न मजला,
नाते तुझे नि माझे ;
कोवळया मनात काही,
रुजले अन अंकुरले !
सुचले कधी न मजला ,
सवारने मनास माझ्या ;
स्वप्नात सुगंधी काही ,
फुलले अन बहरले
रुचले कधी न मजला ,
फसविने स्वत: ला ;
हरविले माझे काही ,
अन मी मोहरून गेलो !
- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...