Wednesday, August 11, 2010

भावनांचा बाजार

इथे भावनांचा बाजार पहिला
इथे मी मनांचा आजार सहिला

दिसल्या कुनाकुनाला जखमा उराताल्या

दीपज्योती विझून गेल्या माझ्या घरातल्या

माझ्याच वागण्याचा अर्थ मला कलेना

मतलबी या जगात स्वार्थ मला कलेना

नको नको रे आता हे अगतिक अस्तित्व

गेली जलुन अस्मिता, गेले फासावर स्वत्व

आयुष्य  नाव आहे फक्त आघातांचे

आभार मानले मी सारयाच
घाताक्यांचे

माझ्या समोरून गेली माझी हो प्रेतयात्रा

डोळ्यानी पहिली मी ती अवहेलनेची जत्रा

पोटाशी धरून ज्यानी पाठीत वार
केला
त्यांच्याच साठी
माझा का प्राण घुटमळला

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...