Wednesday, August 11, 2010

चित्र

स्वप्नातले सारे रंग
आता उडून गेले
मी चित्र रेखातनेही
आताशा सोडून दिले
नीले आकाश हिरवी पाने
पक्षांचे मंजुल गाने
सुंदर फुले छठा अनंत
स्वप्नात व्हायचे सारे जिवंत
पण स्वप्नातही
पंख फुटतात
आणि ती उडून जातात
कसले
रंग कसले गंध
विरून गेले सारे  तरंग
आयुष्याचे एक पान
असे कसे कोरेच राहिले ?
अनेकदा रेखातुनही
रंग सारे मुकेच राहिले
पांडर् या शुभ्र कागदावर
आता फक्त धुकेच राहिले ..

मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...