Wednesday, August 11, 2010

रानफुले

तुझ्या वाटेवर मी सांडले माझे अश्रु
त्यातील वेदनेच्या बिजान्कुरांची
आज रानफुले झाली आहेत
तू माघारी आलीस तर
तुला दिसतील त्या फुलांत
माझ्या व्यथित मनाची
हलुवार स्पंदने !
पण तू बदलली आहेस
तुझी वाट
आणि माझ्या पर्यंत येणारे रास्ते

बंद केलेस कायमचेच.....

- मनोज गोबे 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...