Thursday, August 12, 2010

तूच होती तूच आहे

पावले मी टाकलेली ती आता थकनार नाही
तू जरिही थाम्बलेली मी तरी रुसनार नाही

घाव माझ्या भावनेला घातला त्यानी जरिही

तू तुकवली मान तेव्हा मी तरी झुकणार नाही

ठेवला विश्वास होता हसरया नयनात काल्या
वाटले तुज घाव देता मी अता उरणार नाही

दे मला कालिज माझे सोड त्या हट्हस वेडे

सांग डोळ्यातील पान्या आग ही शमनार नाही
 
छाटले  बाहुस किंवा  तोडले पायास दोन्ही
दाटल्या अश्रुस माझ्या सांग मी रडणार नाही

तूच होती तूच आहे तूच माझी प्रानज्योती

दांडगा विश्वास माझा हा कधी खचनार नाही

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...