Saturday, August 14, 2010

|| पत्रिका ||

|| पत्रिका ||

आली हातात पत्रिका

माझ्या मुन्नीच लगीन
कुणी पोठामंदी  माझ्या
भोकसलिया संगीन ..

सया, सख्या , सविशिनी

हाती भरताती चुडा
तिचा मायेचा तो हात
पाटी भासतो आसुडा

गोऱ्या अंगाला हालद

लाविती सख्या साजनी
माजं भिजवती गाल
तुझ्या डोळ्यातील पानी

रेशमाच्या भान्गामंदी

तिने भरलय कुंकू
तिच्या दराहून जाता
आता नको आत वाकू

काल्या पिवल्या मन्याची

तिन पोत ओवियली
काय ठाउक  कुणाची
तिन गुढी उभारली

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...