Saturday, August 14, 2010

काल मला स्वप्न पडलं

काल मला स्वप्न पडलं
स्वप्नात दिसलं घरकुल आपलं

घराभोवातली बाग होती

पाना फुलांना जाग होती

फुलेही थोड़ी कुजबुजली
माझ्याकडे बघून हसली

मी म्हटलं हसलांत का ?

तशी मला बोलू लागली

जीवन आमचं क्षणिक असतं

तरीही आम्ही फुल्तोच ना

वारा असो व़ा नसों

तरीही आम्ही खुलातोच ना

आम्ही कधी रडतो का

मनामध्ये कुढतो  का ?

खुडण्या जेव्हा येता तुम्ही

हात तुमचा धरतो का

फुलेही मला सांगुन गेली

तुम्ही सदा हसत रहा

आमच्या सारखा आनंद

चार घरी वाटत रहा

पाना फुलांचा निर्मल मंत्र

सरयाजनानना सांगत जाऊ

हाच मंत्र मनी जपुनी

जीवन गाने गात राहू

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...